Ad will apear here
Next
‘ओएनपी’ रुग्णालयातर्फे मोफत सत्राचे आयोजन
पुणे : ‘गरोदर स्त्रीने काय खावे आणि काय टाळावे, गर्भवतींना व्यायामाचा कसा फायदा होतो, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत कशी काळजी घ्यावी, असे विविध प्रश्न गर्भवतींच्या मनात असतात. अशा सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी ऑयस्टर अँड पर्ल (ओएनपी) रुग्णालयातर्फे एका खास सत्राचे आयोजन केले आहे. या सत्रासाठी गरोदर स्त्रियांना मोफत प्रवेश आहे,’ अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका व प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता फडणीस यांनी दिली.

हे सत्र १६ जून २०१८ रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत कोथरुडमध्ये मयूर कॉलनी येथील अंबर हॉलमध्ये होणार आहे. यात डॉ. अमिता फडणीस यांच्यासह डॉ. मीनल मेहेंदळे, डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. गीता ठाकूर, डॉ. रेणुका सुरपुर, आहारतज्ज्ञ पल्लवी निगवेकर मार्गदर्शन करणार आहेत.

‘ओएनपी’ रुग्णालयातर्फे ‘वूम्ब’ (वेलनेस ऑफ मदर अँड बेबी) हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहराच्या विविध भागांत गर्भवतींसाठी मोफत सत्रांचे आयोजन केले जाते. या सत्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर गरोदरपणातील काळजीबरोबरच व्यायाम, योग व प्राणायमचे महत्त्व, गर्भसंस्कार, गरोदरपणातील दंतोपचारांमध्ये घेण्याची काळजी, नवजात बाळाची काळजी, स्तनपान अशा विविध विषयांसंबंधी माहिती दिली जाते.

सत्राविषयी :
दिवस : शनिवार, १६ जून २०१८
वेळ : सायंकाळी चार ते सात.
स्थळ : मयूर कॉलनी येथील अंबर हॉल, कोथरुड, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZVPBP
Similar Posts
गर्भवती महिलांसाठी ‘प्रेगोदीवा’चे आयोजन पुणे : गर्भवतींच्या कौतुक सोहळ्याला आधुनिक स्वरूप देत ओएनपी रुग्णालयाने ‘प्रेगोदीवा’ या खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गर्भवती महिलांना चक्क ‘रँप वॉक’ करण्याची संधी मिळणार आहे. बाळंतपण सुरळीत व्हायच्या दृष्टीने गर्भारपणात केल्या जाणाऱ्या ‘बेली डान्स’ला सध्या प्रचंड लोकप्रियता प्राप्त
ओएनपी रुग्णालयात विविध उपक्रम पुणे : नुकत्याच झालेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त ऑयस्टर अँड पर्ल (ओएनपी) रुग्णालयातर्फे महिनाभर विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
तीन महिन्यांच्या बालकावर अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी पुणे : केवळ तीन महिन्यांच्या आणि साडे चार किलो वजनाच्या बालकावर अत्यंत अवघड हृदयशस्त्रक्रिया यशस्वी करण्यात येथील ‘ऑयस्टर अँड पर्ल’ (ओएनपी प्राईम) रुग्णालयाच्या डॉक्टरांना यश आले आहे.
‘कृत्रिम गर्भधारणा उपचारांची यशस्वितता वाढली’ ‘मूल होण्यासाठीची नैसर्गिक प्रक्रियाही ३० टक्के वेळाच यशस्वी ठरते. त्यामुळे ‘आयव्हीएफ’ उपचारांच्या आधारे होणाऱ्या कृत्रिम गर्भधारणेला असलेल्या काही मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. परंतु गेल्या पंचवीस वर्षांत वंध्यत्त्वावरील उपचारांची यशस्वितता १० ते १२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढली आहे’, असे मत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language